जुळले प्रेमाचे नाते - भाग-११

(14)
  • 13.4k
  • 1
  • 6.6k

सकाळच्या अलार्मने मला जाग आली. मी देखील जास्त टाईमपास न करता उठून फ्रेश व्हायला गेले. छान तय्यार होत आवरून बाहेर आले. जास्त नाही साधा ब्लॅक टिशर्ट आणि खाली ब्लू जीन्स. थंडी म्हणून माझं आवडत मऊ मऊ पिंक स्वेटर. आई आज माझ्यासाठी लवकर उठली होती.. जाणार म्हणून तिचीच जास्त घाई चालू होती.. मी गप्प जाऊन डायनिंग टेबलावर बसले... तोच निशांतचा कॉल आला.., तस आईने त्याला ही वर बोलावून घेतलं. बळे-बळेच त्याला नाश्ता करायला लावला सोबत मला ही. खाऊच्या पदार्थांची एक बॅग माझ्या बॅगेत टाकून दिली.. प्रवासात लागेल म्हणुन.. पण कोण खाणार होत ते तेलकट वैगेरे.. पण आई पुढे कोणाचं काय चालतं...