वारस - भाग 8

(19)
  • 14.8k
  • 7.2k

8दुसऱ्या दिवशी रविवार होता.शाळेला सुट्टी असल्याने कविता पण आज घरीच होती.सुमारे सकाळचे अकरा वाजले असणार ,कविता भरभर पावलं टाकत विजूचा घरी जात होती,त्या तशा वातावरणात पण तिला दारुण घाम फुटला होता... घरात घुसत नाही ते लगेच चिमणी दारातच उभी होती,,शाळेत पण तिला शिकवायला कविताच असल्याने दोघींची चांगलीच गट्टी जमली होती, तुम्ही विजू दादा साठी आलात ना इथं,,पण विजू दादा तर झोपूनच आहे काय, अकरा वाजता ,तिला त्याच्या त्या शहरातल्या या आळशी सवयीचा आधीच राग यायचा आणि त्यात आज तर घाई पण होती. चल आपण जाऊन उठवू त्याला ,अस म्हणत दोघीही त्याच्या खाटे जवळ गेल्या.आजूबाजूला अनेक पुस्तक अस्ताव्यस्त पडलेले होते.कदाचित रात्रभर काहीतरी वाचत बसला असणार तो..