जुळले प्रेमाचे नाते - भाग-१०

(14)
  • 11.8k
  • 6.4k

रात्रभर काही जाग आलीच नाही.. आज सकाळीच मला जाग आली घडाळ्यात पाहिलं तर सकाळचे सात वाजले होते... रात्री कमी खाल्याने आता पोटात कावळे ओरडू लागले होते.. चांगलीच भूक लागली होती. एक नजर मोबाईल वर टाकली पण निशांत चा मॅसेज किव्हा कॉल नव्हता. तशीच उठली आणि छान फ्रेश होत मी आज पहिल्यांदाच एवढ्या सकाळी उठुन किचनमध्ये गेले.. स्वतः साठी आधी कॉफी बनवली... हा आता ती निशांतच्या कॉफीसारखी नक्की नव्हती झाली. पण ठीक आहे.. मग आई-बाबांसाठी चहा आणि पोहे करून ठेवले.. वाफळलेली कॉफी घेऊन मी माझ्या रूममधे आले.. सहज म्हणुन निशांतला कॉल केला तर त्याने कॉल काही घेतला नाही.. कदाचित झोपला