कुस्ती - भाग ३

  • 8.1k
  • 1
  • 3.6k

भाग ३ - कुस्ती प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. एका रात्री पारू या तिची जिवलग मैत्रीण चंदाला घेऊन शिवाच्या रानातील खोपटात रात्रीच त्याला भेटायला आली होती. बाहेर चंदाला लक्ष ठेवायला सांगून ती हळूच खोपटात शिरली. बाजेवर उघड्या अंगाचा शिवा, छताला पडलेल्या बिळातून चंद्राचा प्रकाश हातात घेत काहीतरी पुटपुटत होता. शिवाचं पिळदार सावळं रूप पारू डोळ्यांनीच पिऊ पाहत होती. ती त्याच्या डोक्याजवळ हळूच सरकली अन हातांनी शिवाचे डोळे झाकले. अचानक असा कोमल स्पर्श आपल्या डोळ्यांना कसा काय झाला म्हणून