मित्र my friend - भाग २

  • 10.4k
  • 6.1k

विवेकला प्रियाचा स्वभाव माहित होता.. हट्टी होती ती... उडी मारणारच... त्यासाठी,त्याने ती बोलत असतानाच, खांद्यावरून त्याची बॅग हळूच बाजूला ठेवली. आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिला. विवेक आपल्या मागे येऊन उभा राहिला हे जसं प्रियाच्या लक्षात आलं तसं तिने उडी मारली. विवेकने चपळाई करत प्रियाचा हात पकडला. खाली पडता पडता वाचली, पण एका झटक्याने खालच्या भिंतीला आपटली. डोक्याला लागल्याने बेशुद्ध झाली... आली का पंचाईत... विवेकने घट्ट पकडून ठेवलं होतं. पण तिला वर कसं खेचणार.. आजूबाजूला कोणी नाही.. मग काय करणार... हळू हळू तिला वर आणलं. कठड्यावर झोपवलं... तिला बसवण्याचा प्रयन्त करत होता तर पुन्हा तोल गेला.आणि ती उलट दिशेला, विवेकच्या