(सदर कथा काल्पनिक असून त्याचा संबंध कोणत्याही सिनेमाशी... कथेशी नाही... संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा... हि कथा आपल्याला खूप मागे घेऊन जाते.... ज्या काळात social media, FB , मोबाईल असं काही अस्तित्वात नव्हतं ... निदान भारतात तरी... ) हो सर.. करतो मी... रात्री पर्यंत देतो करून... विवेक त्याच्या बॉसला म्हणाला. मनात नसून सुद्धा त्याला पुन्हा कामाला बसावं लागलं. एकतर तिघांचे काम एकटा करून दमला होता. दोघेजण ऐनवेळी आले नव्हते. त्यांचे काम करून निघत होता ,तर निघताना पुन्हा त्याच्या बॉसने वेगळं काम करायला सांगितलं. काय करणार मग... करत बसला काम रात्रीपर्यंत. दुसऱ्या दिवशीही तेच... एक संपत