भाग २ - भेट प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. भापकर पाटील हा गावचा बडा आसामी. शिवरायांनी मंजूर केलेल्या सारा पट्टी पेक्षा जास्त सारा गावकाऱ्यांकडून वसूल करायचा. आसपासच्या चार पाच वाड्या वस्त्याही त्याच्या अमलात होत्या. खोटे दस्तावेज बनवून शेतकरी अन व्यापाऱ्यांकडून जास्त पट्टी वसूल करायचा. कुस्तीचा खूप नाद, चार पाच मल्ल त्याने पोसलेले. अन त्यासाठी स्वतःचा आखाडा बनवलेला. शिवरायांनी स्वराज्यात घालून दिलेल्या नियमानुसार कुणालाही स्वतःची घोडी वा फौज बाळगण्याची परवानगी नव्हती. तरीही पाटलांनी स्वतःची वीस पंचवीस घोड्यांची पागा ठेवलेली