जुळले प्रेमाचे नाते - भाग-९

(17)
  • 12.5k
  • 6.4k

कालचा दिवस एवढा गोड आणि आनंदी गेलेला की मी सारखं ते आठवुन गातल्या गालात हसत होते. फ्रेश होऊन आज लवकरच कॉलेजला पाहोचले. स्वतःचा अभ्यास करत बसले होते की हर्षु आली.. "काय ग प्राजु निशांत ला पाहिलस का ग तु.??? आल्यापासून दिसला नाही मला. तुला माहीत आहे ना त्याला बघितल्या शिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही..?!!!" हर्षुच्या अशा बोलण्याने मी गप्प होते. पण माझ्या फेसवरील स्माईल तिने अचुक ओळखली. "काय ग प्राजु तुला काय झालं..?? एवढी का हॅप्पी आहेस..??" तिने डोळा मारत विचारल. "काही नाही ग. सहजच." मी ही काही तरी बोलायच म्हणून बोलले खर पण निशांत सोबतच्या आठवणी आठवुन