कथा- सचिनचे बाबा ---------------------------- रात्रीचे अकरा वाजले रोजच्या नियमाप्रमाणे शोभनाताईंच्या मुलाचा फोन येणार .. पण आज साडे -अकरा वाजले तरी सचिनचा फोन नाही , तो कामात असेल म्हणून बोलत नसेल तर स्नेहाने तरी फोन करायचा न ", त्या स्वतःची समजूत घालीत बसल्या . पण त्याचा फोनची वाट पाहून ही फोन काही येईना .. असे तर नाही ना की - आता या पुढे आई-बाबांनी-विशेषता: बाबांनी ,यापुढे आपल्याकडे येउच नये , त्यांना न बोलावणे हेच बरे असे तर सचिन -स्नेहाने ठरवले नाही ना ? या कल्पनेने शोभनाताईंच्या मनात धस्स झाले . याला कारण सचिनचे बाबा आणि त्यांचे सगळ्या सोबतचे वागणे आणि