अतर्क्य भाग ३

  • 5.5k
  • 2.6k

लग्न सुरळीत झाले. संपूर्ण कार्यक्रमात निधी आणि प्रिया दोघींचे डोळे सारखे भरून येत होते . जड अंतःकरणाने दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला . फोन होतेच की संपर्कासाठी .. आणि मांडव परतणीसाठी प्रिया माहेरी येणारच होती काही दिवसासाठी .मग भेट होणारच होती . हनिमुनसाठी नवीन जोडी मनालीला गेली होती . समित खुप उत्साहित होता . बरेच प्लान होते मनात त्याच्या . पण गेल्यावर एक दिवसभर प्रिया उदासच राहिली होती . कदाचित थकली असेल म्हणून समितने काहीच फोर्स नाही केला . बाहेर फिरायला गेले तरीही प्रिया बळेबळे सगळे रेटत होती असे वाटले समितला दुसर्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर दोघे थोडे फिरुन