बंदिनी.. - 5

  • 13.8k
  • 1
  • 6.4k

मी ठरवलं.. आजपासून अनय पासून जरा लांबच राहायचं.... पुढे.. असं मी ठरवलं खरं.. पण त्याच्यापासून दूर राहणं खूप कठीण होतं माझ्यासाठी... एक क्षणही राहू शकत नव्हते मी त्याच्याशिवाय... तो जरा जरी दिसला नाही तरी सैरभैर व्हायचे मी.. पण माझी ही अवस्था मी तन्वी ला कधीच कळू दिली नाही.. एकदा बोलता बोलता मी तिला विचारलं होतं की 'तू अनय ला like करते का?'.. ती थोडीशी लाजली अन्‌ म्हणाली.. 'हो.. म्हणजे... असंच... as a friend.. ?'.. ती जरी स्पष्ट बोलली नाही तरी मला कळत होतं तिच्या मनात काय आहे ते.. त्यादिवशी मी, माझे दोन कलीगस्, आणि आमचे डायरेक्टर आणि मॅनेजर