बाबूरावांच्या झोपेची चित्तरकथा

  • 10.9k
  • 1
  • 4.3k

उद्धव भयवाळ औरंगाबाद बाबूरावांच्या झोपेची चित्तरकथा मध्यंतरी एका रविवारी सकाळी सकाळी माझे साहित्यिक मित्र बाबूराव माझ्याकडे आले. त्यांच्या डोळ्यांकडे पाहून मी समजून चुकलो की काल रात्री त्यांची झोप झालेली दिसत नाही आणि त्या झोपेबद्दलचे गाऱ्हाणे करण्यासाठीच ते माझ्याकडे आलेले असावेत. हे जाणूनच मी त्यांना विचारले, "काय झाले बाबूराव? आज सकाळी सकाळीच माझ्याकडे दौरा?"तर ते म्हणाले," काही विचारू नका. माझ्या झोपेचं काल रात्री पुन्हा त्रांगडं झालं." काय झालं असावं ते माझ्या लक्षात आलं. तरी मी त्यांना विचारलं," काय झालं?"ते म्हणाले," तुम्हाला माहीत आहे की, आमच्या कॉलनीच्या पलीकडेच एक मंगल कार्यालय आहे."मी म्हटलं, "हो. मला माहीत आहे. त्याचं काय?" "तर तिथे आज एक लग्न आहे.