मारेकरी!

(12)
  • 21.5k
  • 8.9k

हॉटेल 'लव्ह बर्ड्स'च्या मागच्या लॉनवर, ती तिघे बसली होती. "श्लोका! हि स्वीटी! माझी होणारी बायको! महत्वाचं म्हणजे हि 'वास्को' लीकरवाले पाखरे यांची कन्या आहे!" सुमितने नाटकी ढंगात स्वीटीची ओळख, श्लोकाला करून दिली. लीकरच्या बॅरल सारख्या 'स्वीटी'ने दोन्ही हात जोडून नमस्कार केल्या सारखा केला. श्लोकांची अवस्था शोचनीय झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटत होते. "म्हणजे? तू हिच्याशी लग्न करणार? अन माझं --माझं काय? आपलं प्रेम? त्याच काय?" स्वीटीकडे दुर्लक्ष करत श्लोकाने काकुळतेने विचारले. "आपलं प्रेम ना? ते तसेच राहील, ग! मी स्वीटीला सगळं सांगितलंय! तिची मुळीच हरकत नाहियय!" तो निर्लज्जपणे म्हणाला. श्लोकाच्या मनाचा तोल गेला. संतापाचा पार उकळू लागला. तिने फाडकन सुमितच्या मुस्काटात मारली! समोरचा ज्युसने भरलेला