अतर्क्य भाग २

  • 5.1k
  • 2.3k

समित आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता . एक बहीण होती पण ती लग्नानंतर आपल्या पतीसोबत परदेशी स्थायिक झालेली होती . त्याचे आईवडील दिल्लीला स्थायिक होते .तिथे त्यांची मोठी कोठी असुन पिढीजात कार व्यवसाय होता समितचे काका व वडील मिळुन हा व्यवसाय पहायचे .. सी ए झालेल्या समितने स्वतःचे ऑफिस नागपूरला येथे थाटले होते . प्रथम भाड्याच्या जागेत असलेले हे ऑफिस तीन चार वर्षातच स्वतःच्या जागेत स्थलांतरित झाले होते . शिवाय त्याचा स्वतःचा चार खोल्याचा एक ब्लॉक पण होता . लहान वयात त्याचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे होते, हे स्थळ अगदी लाखात एक होते ,प्रियाला कसलाच त्रास होणार नव्हता ना कसली जबाबदारी