दाम्याच्या उल्लेखा शिवाय माझे अन त्याचे बालपण पूर्ण होणार नाही. दाम्या माझ्या पाचवीला पुजलेला! म्हणजे पाचवी पासूनचा वर्ग मित्र, ते थेट म्याट्रिक (मी ) होईपर्यत एकाच शाळेत.तो सातवीत, मी एस. एस. सी. होईपर्यंत थांबला. मी कॉलेज साठी आणि त्याने बाह्य जगातून ज्ञानार्जना साठी शाळा सोडली. दाम्या चांगला माझ्या पेक्षा तीन -चार वर्षांनी मोठा. सॉलिड काळे चिप्प बसवलेले घनदाट तेलकट केस. वर्गात बाकावर बसला तरी उठून दिसायचा! उंची मुळे वास्तव्य कायम मागच्या बाकड्यावर. काळा रंग दोन प्रकारचा असतो, एक धुरकट, आणि दुसरा तेलकट, त्यातला तो तेलकट काळा! नाकी डोळी नीटस पण गबाळ रहाण. आडमाप कपडे. पण त्या काळी सगळ्यांचेच कपडे गबाळे