प्रीतीची 'प्रेम'कथा - 21

  • 6.7k
  • 2.5k

२१ जय मंचरजी अर्थात प्रेमला धक्का! पुढे दोन तीन का कितीतरी दिवस असेच गेले. असेच म्हणजे कसे विचारू नका. एकेक दिवस खायला उठायचा. संध्याकाळी उगाच बाहेर पडायलाच हवे. नाहीतर त्या जाॅबचे काय झाले विचारेल आई. मिलिंदा मेसेज पाठवायचा, 'समस्या हल करनेकी हमारी हर संभव कोशिशें जारी हैं. कृपया सहयोग करें.' एकतर त्याचा बाॅस बाहेर गेलेला म्हणे. तो येईतोवर काहीच करणे शक्य नाही. मग काही विरह गीते ऐकत पडून राहायची मी. संध्याकाळी कालिंदीकडे जाऊन वेळ घालवायचा. हे किती दिवस चालणार? न जाने क्यूं होता है ये जिंदगी के साथ.. अचानक ये मन.. लेकरके उसकी याद.. छोटी छोटीसी बात.. त्याच्या