प्रीतीची 'प्रेम'कथा - 17

  • 5.2k
  • 1.9k

१७ पूर्णानंदाशी भेट अर्थात एकच लक्ष्य: प्रेमचे प्रेम! उगवत्या दिवसाचा उगवता सूर्य कसल्या आयडिया घेऊन येईल? मी रात्रभर विचार करायचा प्रयत्न केलेला. पूर्णानंदास कसे गाठावे? भिंदिच्या नकळत? नि कदाचित त्या जगदाळे काकांच्याही नकळत. माझे डोके चालेना. पण मिलिंदाने काही तरी डोके लढवले असेल रात्रीतून तर.. असेल नाही .. असायलाच हवे. सकाळी काकुला फोन लावला. ती म्हणाली, "भिऊ नकोस मुली मी तुझ्या पाठीशी आहे." म्हटले, "नुसती पाठीशी राहून काय फायदा.. मिलिंदाला काही तरकीब सुचली की नाही?" "अर्थातच .. तो माझा मिलिंदा आहे! तू ये. सांगते. हम करेंगे तुम्हारे आनेका इंतजार.. करो बहन हमपर तुम ऐतबार.. ये लवकर." मी