प्रीतीची 'प्रेम'कथा - 15

  • 5.5k
  • 2.2k

१५ मीठू मीठू अर्थात पहिला प्रेम संवाद घरी आले तोवर मनातले हिशेब करून झालेले होते. सारे काही सकारात्मक. स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे. या विद्रोहीचा कशात विश्वास नाही म्हणे. आणि ते सीनियर जगदाळे .. बहुधा त्याच्यासाठीच शोधत बसलेत मुलगी! हे असेच असावे. बापाला आपल्या मुलाची ज्वालाग्राही मते ठाऊक असणार. म्हणूनच त्यांनी त्यादिवशी मुलाबद्दल काहीच सांगितले नसणार! किंवा भिंदि आणि तात्यांना ठाऊक असेल का? कोणास ठाऊक! आई म्हणाली, "तात्या भेटले? " "हुं" "काय म्हणाले?" "तात्या? कशाबद्दल?" "जगदाळेंबद्दल. ते स्थळ आलेले त्याबद्दल?" "मला? मला काहीच नाही बोलले." इतक्यात तात्याच आले घरी. उत्साहात होते. म्हटले काय झाले असावे? भिंदि.. जगदाळे .. चांगला मूड..