प्रीतीची 'प्रेम'कथा - 12

  • 5.2k
  • 1
  • 2.1k

१२ जगदाळे.. अर्थात कांदेपोहे! घरी आली तर आई वाटच बघितल्यासारखी उभी होती. म्हणाली, "बरं झाले बाई तू आलीस. तुझीच वाट पाहात होते." "जेवायला?" "नाही. तुझ्या तात्यांचा फोन होता. कुणीतरी येणार आहेत पाहुणे." "हुं.. परत कुणी लेखक असेल. खाईल श्रीखंड पुरी आणि होईल बेपत्ता!" मी प्रेमवरचा राग असा काढेन असे मलाही वाटले नव्हते! पण तो आपोआप निघाला! "पण आई येणार आहे कोण?" "अगं कुणी आहेत पाव्हणे. तुला बघायला येणार आहेत." "मला? आणि बघायला? मी काय शोकेसमधली बाहुली आहे?" "अगं, तुझ्या वयातल्या पोरी लग्न होऊन सासरी गेल्या आणि तुझा कशाचाच पत्ता नाही!" आहे! पत्ता आहे! आणि माझ्याजवळ त्याचा पत्ताही आहे!