प्रीतीची 'प्रेम'कथा - 11

  • 5.9k
  • 1.9k

११ परत भिंगारदिवे! अर्थात आॅपरेशन प्रेम! सकाळी मिलिंदा, काकु नि बुरख्यातली मी तिघेही गेलो, त्या साहित्य दिवे प्रकाशनातल्या भिंगारदिव्याला भेटायला. आज भिंगारदिवेचा उशीरा येण्याचा बेत होता. बाहेरचा तो माणूस म्हणाला तसा नि माझ्याकडे पाहून म्हणाला, "बोलवून घेऊ ना त्यांना. सांगतो चॅनेलचे लोक आलेत." मिलिंदा म्हणाला, "ठीक. आम्ही थांबतो थोडा वेळ." तो फोन करायला आत गेला. कालिंदी म्हणाली, "हमे है बेसब्रीसे इंतजार की आएंगो वो.. पण इधर भटके उधर भटके.. वो देते हैं खो!" "आता खो खो हसते मी.." "सुलताना.. तमीजसे बात करो! पठाणसाहिबा!" मी चपापून गप्प झाली. न जाणो भिंगारदिवा उगवला अचानक तर. तो आतला माणूस येताना दिसताच