प्रीतीची 'प्रेम'कथा - 10

  • 5.5k
  • 2.2k

१० भिंगारदिवे! अर्थात प्रेमानंदाचा अर्धा शोध! प्रकाशक भिंगारदिवे. साहित्य दिवे प्रकाशन! यांनी कसले लावलेले दिसतात दिवे? आम्ही त्या अंधाऱ्या आॅफिसात पोहोचलो तेव्हा भिंगारदिवे बिझी होते म्हणे. म्हणजे बाहेर फक्त सांगितले आम्ही, "भिंगारदिवे साहेबांना भेटायचेय!" त्यावर उत्तर, "साहेब बिझी आहेत मिटींगीत. थांबावे लागेल." "आम्ही ज्वालाग्राही सर्वदाच्या रिपोर्टर.. मी मिस कालिंदी कुरतडकर आणि ही कॅमेरावुमन सुलताना पठाण. साइझवरून वाटत नसेल पठाण पण लग्नानंतर नाव बदलते त्यांच्यात पण.. होय की नाही गं." "सच कहा आपने मोहतरमा. पर लगता नहीं हमारा नसीब अच्छा है.. लगता नहीं साब हमें इंटरव्ह्यू देंगे." टीव्ही चॅनेल आणि इंटरव्ह्यू म्हटल्यावर तो बाहेरचा तीन ताड उडाला. मी कॅमेरावरून