मी एक अर्धवटराव - 23

  • 5.2k
  • 2k

२३) मी एक अर्धवटराव! त्यादिवशी सायंकाळी आम्ही दोघे जेवायला बसलो होतो. नेहमीप्रमाणे टीव्हीवरील मालिका चालू होत्या. एका वाहिनीवरील एक मालिका एका विशिष्ट आणि रंगतदार वळणावर असल्यामुळे आम्ही दोघेही मन लावून पाहात होतो. प्रसंगी सौ'ची स्थिती अशी होई की, हातातला घास तोंडात टाकताना तो ओठांजवळ तसाच ठेवून किंवा घास चावताना तसाच थांबवून ती तो प्रसंग बघत होती. तितक्यात मला जोरदार ठसका लागला. एका क्षणात ठसक्याने उग्र स्वरूप धारण केले. मला काहीही सुचत नव्हते, डोळ्यात आसवांनी गर्दी केल्यामुळे मला समोरचे काहीही दिसत नव्हते. हातातील आणि तोंडातील घास खाली पडला. घशात खवखव, आग होत होती. नाकातूनही पाणी येत असताना कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. "झालं?