२२) मी एक अर्धवटराव! एक प्रसंग, एक घटना माझ्या कायम स्मरणात आहे. आमच्या लग्नानंतर आम्ही माझ्या नोकरीच्या गावी आल्यानंतर साधारणतः दोन महिन्यांनी घडलेली ही घटना... शनिवारची रात्र! झोपताना विचार केला की, उद्या रविवार आहे. जरा उशिराने उठू परंतु मध्यमवर्गीय मानवाच्या नशिबात कुठले आलेय हे भाग्य? 'जन्मोजन्मीचे नाते जडलेय बायकोशी, झोप कशी मिळेल सुट्टीच्या दिवशी?' असे काहीसे नाते नवराबायको, सुट्टी आणि झोपेचे असते. रविवारी सकाळी गाढ झोपेत असताना कशाच्या तरी आवाजाने झोप चाळवली. उठावेसे वाटत नव्हते. डोळा उचलत नव्हता. पुन्हा तोच आवाज आला. यावेळी थोडा जागा असल्यामुळे आवाजाचा धनी कोण असेल याची पुसटशी कल्पना आली आणि मी दचकून, डोळ्यातील