मी एक अर्धवटराव - 21

  • 5.9k
  • 2.1k

२१) मी एक अर्धवटराव! सकाळी सकाळी गरमागरम पोहे म्हणजे व्वा! क्या बात है। अशी स्थिती! पूर्वीपासूनच गरम पोहे हा पदार्थ माझ्यासाठी जीव की प्राण! त्यादिवशीही आम्ही दोघे पोह्यावर ताव मारीत असताना सौ. म्हणाली," का हो, मंदिरात जाणार असालच तर चार-पाच भाज्या घेऊन या ना. अरे, हो. बघा. मी सारखी आठवण करते, पिच्छा करते ते तुम्हाला पटत नाही. पण मी सांगितले नाही तर एक तरी आठवण तुम्ही आठवण ठेवून करता का हो?""काय झाले आता?" मी विचारले. तिने इकडेतिकडे पाहात शक्य तितक्या हळू आवाजात विचारले,"अहो, लॉकरचे काम केलेत का?""तू दागिने दिल्याशिवाय मी बँकेत जाणार कसा?" मी उलट विचारले"तेच ते. करावे, द्यावे