मी एक अर्धवटराव - 18

  • 6.6k
  • 2.2k

१८) मी एक अर्धवटराव! सायंकाळची वेळ होती. मस्त थंडगार हवा सुटली होती. खिडकीतून बाहेर पाहिले की, छान पैकी पसरलेला संधीप्रकाश लक्ष वेधून घेत होता. तशा वातावरणात गॅलरीमध्ये आम्ही दोघेही गप्पा मारत बसलो होतो. बायकोचा मुड चांगला असला म्हणजे आम्ही दोघेही गॅलरीत नेहमीच बसतो. कधी चहा घेत. कधी वातावरण जास्तच आल्हाददायक असले तर गरमागरम भज्यांचा आस्वाद घेत. कधी मक्यांची कणसं खात तर कधी काही आणि उन्हाळ्यात तर दररोज तिथे बसून जेवणाचा आमचा नित्यक्रम ठरलेलाच. अचानक काही तरी आठवल्याप्रमाणे बायको म्हणाली,"अहो, काल सायंकाळी तुम्हाला ब्लाऊजपीस आणि अस्तरचा कपडा आणायला सांगितले होते. आणला का हो?""कालच सायंकाळी आणला. मी आलो तेव्हा