मी एक अर्धवटराव - 16

  • 5.7k
  • 2.3k

१६) मी एक अर्धवटराव! सकाळचे सव्वासात वाजत होते. मी लवकरच उठलो होतो. मी फेसबुक, व्हाटस्अप यावरील संदेश आणि चित्रांचे मनापासून अवलोकन करीत होतो. उलट टपाली संदेशही पाठवत होतो. डोळे, मन, शरीर जरी भ्रमणध्वनीवर खिळून होते तरी कान मात्र एका विशिष्ट आवाजावर लक्ष देऊन होते. तितक्यात मला अपेक्षित असलेला आवाज आला,"अहो, ऐकलत का?" त्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. मी भानावर येत पुटपुटलो,'चला. बस करा. महाराज, बुलावा आया है। उठा...'असे म्हणत मी भ्रमणध्वनी टप्प्या-टप्प्याने बंद करीत असताना पुन्हा आवाज आला. मला एक कळत नाही. माझ्या बायकोला एक गोष्ट केव्हाच का कळत नसावी की, शयनगृहातून किंवा स्वयंपाक घरातून दिलेला