मी एक अर्धवटराव - 11

  • 5.8k
  • 2.3k

११) मी एक अर्धवटराव! मध्यमवर्गीय विवाहित पुरुष आणि ऊतू जाणारे दूध यांचा काय ऋणानुबंध आहे हे कदाचित देवालाही ठावूक नसावे. मध्यमवर्गीय स्त्रीयांकडून नवऱ्याला हमखास सांगितले जाणारे एक काम म्हणजे, 'अहो, मी जरा अमुक तमुक काम करतेय किंवा मी स्नानाला जातेय गॅसवर दूध ठेवलेय तिकडे जरा लक्ष द्या...' कोणताही नवरा हे काम मी यशस्वीपणे केलेय हे छातीठोकपणे सांगू शकत नाही आणि कुणी असा यशस्वीतेचा झेंडा अटकेपार रोवला असेल तर अशा पतीराजांना 'दूधसम्राट' या पदवीने गौरविण्यात यावे. प्रत्येक वेळी मी स्वतःलाच तेही स्वगत (कारण हा प्रश्न बायकोला विचारायची हिंमत माझ्याजवळ तरी नक्कीच नाही.) विचारतो की, नेमके दूध तापायला ठेवल्याबरोबर स्त्रीयांना इतर