मी एक अर्धवटराव - 9

  • 6.9k
  • 2.6k

९) मी एक अर्धवटराव ! मी माझ्या बायकोच्या माहेरचा जावाई होतोच ना ! माझे सासरही तसे मध्यमवर्गीय पण त्यांनी माझे जावाई या नात्याने सारे कोडकौतुक, मानसन्मान केला. मुळात मी स्वभावाने अतिशय शांत असाच. त्यामुळे मीही माझ्या सासरी किंवा सासरच्या माणसांबद्दल कधी राग, संताप, द्वेष, चिडचिड असे प्रकार केले नाहीत. एकंदरीत मी एक आवडता असा जावाई होतो. त्यादिवशी रविवार असल्यामुळे सारे कसे सुस्तावल्यासारखे झाले होते. तितक्यात माझ्या चुलत सासऱ्यांचा फोन आला. मी उचलताच तिकडून सासरे म्हणाले,"जावाईबापू, नमस्कार. एक छोटे काम होते हो...""मामा, सांगा ना. संकोच करू नका..." माझी परोपकारी वृत्ती जागी झाली."काय आहे, तुम्हाला तर माहिती आहेच