मी एक अर्धवटराव - 7

  • 5.8k
  • 2.3k

७) मी एक अर्धवटराव ! काही दिवसांपासून भर मे महिन्यात चक्क पावसाळा आहे की काय असे वातावरण निर्माण झाले होते. आभाळ गच्च भरून होते. थंडगार वारे वाहत होते. मुसळधार पावसाला सुरुवात होईल अशी लक्षणे दिसत होती परंतु पाऊस हुलकावणी देत होता. त्यादिवशी सायंकाळी चहा संपवून आम्ही दोघे नवराबायको दिवाणखान्यात बसलो होतो. बायको नेहमीप्रमाणे तिच्या कामात दंग होती तर मी रिकामटेकडा बिचारा भ्रमणध्वनीच्या खेळात अडकलो होतो. तितक्यात अचानक अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेला, वातावरण निर्मिती केलेला पाऊस सुरू झाला. तशी सौभाग्यवती मला म्हणाली,"अहो..." कसे असते बायकोने आवाज दिला की, तिचा ध्वनी कानावर आदळतो न आदळतो तोच नवऱ्याचा प्रतिनिधी