सूड ... (भाग १२)

(17)
  • 15.9k
  • 1
  • 9.9k

" पहिले सगळे relax व्हा, मग मी सुरु करतो. " अभिने पुन्हा सगळ्याकडे एक नजर फिरवली. " ok, पहिला प्रश्न विचारतो… आणि खरी उत्तरे मी अपेक्षित करतो. कारण मी खूप माहिती मिळवली आहे. फक्त ती तुमच्याकडून आली तर जास्त बरं होईल." अभिने त्याच्या हातातली काही कागदपत्र तिथे असलेल्या टेबलावर ठेवली. " या एका केसमुळे खूप धावपळ झाली, आम्हा सगळ्यांचीचं… जणू काही आमच्यामध्येच स्पर्धा लागली होती. धावण्याची…. " अभि हसत म्हणाला. " चला… आता आपण सुद्धा एक खेळ खेळूया." सगळे अभिकडे पाहू लागले. " Inspector…. तुम्ही इथे कशाला बोलावलं आहे आम्हाला ? काय असेल ते स्पष्ट सांगा. खेळ वैगरे काय ….