सूड ... (भाग ११)

(17)
  • 16.8k
  • 1
  • 10k

आणखी ३ दिवस गेले. खूप काही माहिती मिळाली होती. खूप गोष्टी समोर आल्या. महेश सांगत होता ते अगदी बरोबर होते. मिस्टर सावंत यांच्यावर बंगलोरला केस चालू होती. परंतु त्यात त्यांच्या business partner ला पुराव्या अभावी सोडण्यात आलं होते. आणि तो business partner होता, राहुल.… होय, कोमलचा होणारा नवरा , राहुल…. त्याच्या विरोधात काही सापडलं नाही.पण त्याचा business पार बुडाला. इकडे दिपेशच्या mobile ची लास्ट लोकेशन गोवा हीच होती. साहजिकच त्याने नंबर बदलला असण्याची शक्यता होती. त्याचा तपास सुरु होता. आता गोवा ऑफिसला जाऊन काही मिळते का ते बघू म्हणून अभि, महेश सोबत गोवाला गेला. काजलच्या flat वर पोहोचले, काजल अर्थात