ना कळले कधी Season 2 - Part 35

(87)
  • 12.6k
  • 2
  • 5.7k

आर्या अजूनही जागीच कशी काय? मला वाटलं झोपली असेल. आणि इतक्या रात्री ही कुणाशी बोलतीये ! जाऊ दे कुणाशी पण बोलो ना माझं काय जात असाही तिच्या मित्र मैत्रिणींचा रात्रीच दिवस चालू होतो रात्री जगायचं आणि मग सकाळी उशिरा उठायचं.खर तर त्याला आर्या ला बोलावं वाटलं पण थोड्यावेळापूर्वी झालेलं भांडण त्याला आठवलं आणि त्यानं बोलायच टाळलं. आणि तो झोपला. कसा आहे सिद्धांत मला सगळ्यांनी 12 ला च विष केलं पण ह्याला साधं लक्षात नाही की आज माझा वाढदिवस आहे मी पण नाही सांगणार! अस जबरदस्तीने कस म्हणायच की विष कर म्हणून.नकोच जाऊ दे पण आज मी सिद्धांत शी