ना कळले कधी Season 2 Part 33

(20)
  • 10.3k
  • 2
  • 5.5k

इतक्या रात्री कोण आलय...? मी पण काय बावळट आहे इतक्या रात्री चोरांशिवाय दुसरं कोण येणार..... बापरे आता काय करु सिद्धांत पण घरी नाही. कुणाला बोलावू ? गेट च्या आवाजाने आर्या चांगलीच घाबरली होती. काय करू यार???? तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला, चावी तर माझ्या आणि सिद्धांत शिवाय इतर कुणाकडे नाही आहे सिद्धांत तर आज रात्री येणं मुळीच शक्य नाही. मग.... चोर ....पण त्याच्या कडे चावी कुठून आली??? पण दाद द्यायला हवी किती कॉन्फिडन्स आहे डायरेक्ट चावीने दार उघडून चोरी..! पण हा विचार करण्याचा ही वेळ नाही आहे. आता काय करु?? मी लपून राहिलेलं च बर !