आईशप्पथ प्रिती कसली चिकनी दिसत होती. राणी कलरची साडी, पापण्यांना हलक्या त्याच कलर्सचे शेडींग, डोळ्यांना काळ्या लायनर्सने अधीकच अॅट्राक्टीव्ह बनवले होते तर केसांची एक बट बर्गंडी रंगाने हायलाईट केली होती. माय हार्ट वॉज रेसिंग हेव्हीली…. थोडक्यात ओळख-पाळख झाल्यावर बाबा लोकांनी टी.व्ही चा ताबा घेतला. मॅच जस्ट सुरु झाली होती. हरभजनला कुत्र्यासारखा धुतला होता. प्रितीचे बाबा त्याला पंजाबी ढंगात शिव्या हासडत होते. “तुम्हाला नाही आवडत हरभजनसिंग?”, बाबांनी प्रितीच्या बाबांना विचारलं..“लेट मी टेल यु.. ही वॉज गुड.. अॅट टाईम्स.. अनप्लेएबल.. पण आता काही अर्थ नाही राहीला त्यात…”, प्रितीचे बाबा..“ओह.. आय थॉट.. ही इज पंजाबी.. सो तुमचा फेव्हरेट असेल..”“सो व्हॉट.. ईट्स अ इंडीअन