मी एक अर्धवटराव - 6

  • 6.9k
  • 2.4k

६) मी एक अर्धवटराव! विवाहानंतर एक-एक दिवस, आठवडे, महिने आणि अर्थातच वर्षेही एकामागून एक जात होती. परंतु माझ्या स्वभावात तीळमात्र फरक पडत नव्हता उलट अंगीभूत असलेले गुण दिवसेंदिवस वाढत होते. नशीब चांगले की,बायको अत्यंत समजूतदार, गृहकृत्यदक्ष होती. कधी माझ्या स्वभावामुळे चिडत होती, रागवत होती, संतापत होती,त्रागा करीत होती, रुसत-फुगत होती, आदळआपट करीत असे पण शेवटी सारे सांभाळून, समजून घेत होती,'पदरी पडले नि पवित्र झाले' याप्रमाणे वागत होती. आमचा संसार कडुगोड आठवणींसह सुरळीतपणे चालू आहे... रविवारचा दिवस उजाडत असताना बायकोच्या कोंबड्याने बांग दिली. नाही! तसे नाही! आम्ही कोंबडाच काय पण कोणताही प्राणी आयुष्यभरात