जुळले प्रेमाचे नाते - भाग-८

(27)
  • 14.2k
  • 1
  • 7.2k

सगळे आईस्क्रीम संपवून परत हॉलमध्ये येऊन बसलो.. "आजोबा गोळ्या घेतल्या का तुम्ही....?" मी त्यांना गोळ्यांची आठवन करून देताच ते रूममधे गेले. मी आणि निशांतने सर्वांसाठी हॉलमध्येच बसण्यासाठी छान अशी अरेंजमेंट केली. मग आम्ही सगळे त्यावर बसलो... बाबांनी मला सगळ्यांसाठी आणलेली गिफ्ट द्यायला सांगितली.. मी एक बॉक्स आजोबांच्या समोर धरला... "आजोबा हे घ्या.. तुमच्यासाठी... आणि दुसरा बॉक्स आजीच्या समोर.. आणि हे आजी तुम्हाला..." "बाळा काय आहे आम्ही काय लहान आहोत का गिफ्ट्स द्यायला..."... आजोबा गिफ्ट्स ही आपल्या जवळच्या व्येक्तिंना द्यायची असतात.. ज्यांना आपण आपलं मानतो..सो घ्या आता." निशांतच्या समोर ही एक बॉक्स धरला... "हे तुझ्यासाठी..." त्याने ही एक स्माईल देत घेतलं.