आली दिवाळी - ६

  • 6.9k
  • 2.6k

आली दिवाळी भाग ६ दिवाळीचा शेवटचा दिवस असतो भाऊबीज .दिवाळीच्या सर्व दिवसात स्त्री शक्तीला मान दिलेला आपण पाहतो .वसुबारस ला गोमाता , नरकचतुर्दशीला आई ,लक्ष्मीपुजनला देवी लक्ष्मी ,पाडव्याला पत्नी आणि भाऊबीजेला बहिण भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केली. या सर्व गोष्टींची परतफेड म्हणून सर्व ऋषी मुनींनी मोठा यज्ञ केला. मग या यज्ञात बळी काय द्यायचे हा प्रश्न पडला. यमराज तयार झाला आणि यज्ञात उडी घेतली. यमाने यज्ञात उडी घेतली, असे कळताच बंधू