मी एक अर्धवटराव - 5

  • 7.3k
  • 1
  • 2.9k

५) मी एक अर्धवटराव! मला पहिल्यापासूनच प्रवासाची भारी आवड! त्यातही बसने प्रवास करणे ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणी! आमच्या पिढीने एक काळ असाही पाहिला आहे की, त्याकाळी सर्वसामान्यांना केवळ आणि केवळ लालपरीचा अर्थात महामंडळाच्या बसचा सहारा होता, आधार होता. महामंडळाने जारी केलेल्या योजनांमध्ये ३-५-७- आणि १० दिवसांचे पास अशा योजना असायच्या. ठराविक रक्कम भरून तो पास विकत घेतला की, मग योजनेप्रमाणे तितके दिवस महाराष्ट्र राज्यात फिरत राहायचे. तर असे मुदती पास काढून मी एकट्याने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. ते म्हणतात ना, 'हौसे, गवसे, नवसे' ही त्रयी अनुसरून फिरत असलो तरीही महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेटी देणे हाही प्रमुख