प्यार मे.. कधी कधी (भाग-२०)

(22)
  • 13.8k
  • 3
  • 6.4k

पाहुण्या-रावळ्यांनी आज घर अगदी भरुन गेले होते. बारश्यासाठी मावशीकडे आलेले अनेक नातेवाईक ‘लगे-हाथ’ मला भेटायला आले होते. अनेक जणांना प्लॅस्टरवर सह्या करण्यात आणि ‘गेट-वेल-सुन’ मेसेजेस लिहीण्यातच जास्त उत्साह होता. १२.४५ला प्रिती आली तेंव्हा घरी इतके सारे अनपेक्षीत लोकं बघुन ती काही क्षण दचकलीच. “ओह.. हेच का ते.. अ‍ॅस्कीडेंटचं कारण?”, विमला मावशी डोळे मिचकावत म्हणाली..“तरुण दादा, क्युट आहे तुझी मैत्रीण”, नुकतंच कॉलेज जॉईन केलेली माझी कझीन म्ह्णाली“ओह तु.. मी ओळखते तुला..”, माझी दुसरी एक मावशी अचानकपणे म्हणाली..,”तु सिटी-लायब्ररीमध्ये काम करतेस ना?”“हो..”, प्रिती तीची हॅन्डबॅग ठेवत म्हणाली.. “तुला सांगते विमल..मला एकदा एक पुस्तक काही केल्या मिळत नव्हतं.. हिने मिळवुन दिलंन.. ते कंम्य्पुटरवर