लाल महाल आणि शाहिस्तेखान - भाग २

(15)
  • 10.9k
  • 3.6k

सर्व मंडळी निघाली ?? पद्मावती देवी आणि तुळजाभवानी आणि जिजामाता सर्वांचे आशीर्वाद पाठी घेऊन निघाली...फक्त ४०० जण होते..पुण्यापासून अर्ध्या एक कोसावर राजे आणि त्यांचे सोबती घोड्यावरून उतार झाले..सर्जेरावांकडे पाहून म्हणाले "आमचे काही बरे वाईट झाले तर स्वराज्य राखा वाढवा".. सर्जेराव राजांना मुजरा करून आणि त्यांचे घोडे सोबतीला घेऊन सिंहगडाच्या दिशेने निघाले... काही पावलांवर मोगली वेढा दिसत होता.. चिमणाजी,बाबाजी पुढे आणि पाठी राजे आणि नेतोजी..प्रत्येक चौकीवर तपासणी होत होती..पण आपण छबिन्याचे शिपाई आणि गस्तीला गेलो होतो आणि आपले काम संपवून छावणीत आराम करायला परत चाललो आहोत ..हि थाप पचत होती..कारण शाहिस्तेखानाच्या