आली दिवाळी भाग ५ दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला गेला आहे. पुराणकथेनुसार, प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना बंदी केले. मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे त्रिपादभूमीची याचना केली. बळीने ती मान्य केली. वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारताच बळीने त्याचे स्वत:चे मस्तक नमवून त्यावर तिसरे पाऊल ठेव असे वामनाला सांगितले. वामनाने बळीच्या मस्तकी