प्रीतीची 'प्रेम'कथा - 7

  • 6.4k
  • 2.3k

७ पहिली लढाई अर्थात प्रथम भेट! दोन दिवस गेले. भेटण्याची हुरहुर एकीकडे आणि काय होणार त्याचे टेन्शन दुसरीकडे. काय होणार पेक्षा सारे नीट होणार की नाही याचे टेन्शन! प्रेमने पुस्तकाबद्दल विचारले तर? मी त्याची फक्त प्रस्तावना वाचलेली तिच्या जोरावर काय काय बोलणार? अगदी परिसंवादात विचारल्यासारखे प्रश्न विचारले त्याने तर पुढे काय बोलणार मी? काय करावे नि कसे करावे? सकाळी स्वामीजींचे नाव घेतले नि म्हटले, आता होऊन जाऊ देत. आॅफिसात पोहोचली तर तिथे तात्या वाटच पाहात होते. मोठे टेबल. समोर दोन खुर्च्या. बाजूला फोन त्यांच्या. त्याच्याकडे पाहात बोलली मी, "तात्या, ते आलेत का?" अजून त्याला यायला एक तास