मी एक अर्धवटराव - 4

  • 6.9k
  • 1
  • 2.9k

४) मी एक अर्धवटराव! लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. मी पंधरा दिवसांची रजा घेतली होती. त्यावेळी 'हनिमून' वगैरे अशी प्रथा नव्हती... किमान मध्यमवर्गीयांसाठी तर निश्चितच नव्हती. फार तर लग्न झाले की, नवीन जोडपे एखाद्या देवतेच्या त्यातही कुलदेवतेच्या दर्शनासाठी जात असत. मी रजेचा अर्ज माझ्या साहेबांसमोर ठेवला. त्यावर सरसरी नजर टाकत साहेबांनी विचारले,"पंधरा दिवसांची सुट्टी शक्य नाही. आठ दिवस पुरेसे आहेत. खरेच लग्न आहे ना?""म्हणजे काय? साहेब, सोबत लग्नपत्रिका जोडली आहे...""अहो, अशा पत्रिका शंभर रुपये फेकले की तासाभरात मिळतात. कसे आहे, मी काही असाच या खुर्चीवर बसलो नाही. डोक्यावरचे केस काळे-पांढरे असा प्रवास करून आता तांबडे झाले आहेत.