रक्तरंजित रणसंग्राम - भाग-८

  • 11k
  • 5.4k

भाग ८ - रक्तरंजित रणसंग्राम (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) रात्रीचा दुसरा प्रहर, काळोखी रात्र, घनदाट वनराई, मिट्ट अंधार, रातकिड्यांची किरकिर अन सोबत पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. वाटा निसरड्या झालेल्या होत्या. नाईकांच्या हेरांनी आधीच निश्चित केलेल्या वाटेवरून मार्गक्रमण चालू होते. ठीक ठिकाणी आधीच हेर पेरून ठेवलेले होते. शिवाय, ठरवलेल्या वाटेवर थांबलेले मावळे हातात मशाली घेऊन उभे होते. जसे बाजी अन त्यांचे सोबती येताना दिसतील तेव्हाच मशाली पेटवायचे अन सगळे त्या वाटेवरून गेले