भाग ७ - वेदना (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) रात्रीचा पहिला प्रहर. सगळीकडे काळोख पसरला होता. पाऊसही थांबला होता. गार वारा सुटलेला होता. गडावर ठीक ठिकाणी असलेल्या मशाली फुरफुरत होत्या. सतत सात प्रहरांची पळापळ अन लढून दमलेले मावळे विश्राम गृहांमध्ये आराम घेत होते. राजेही त्यांच्या दालनात विश्राम करत होते. डोळ्यांची उघडझाप चालू होती, झोप मात्र येत नव्हती. बाजींच्या दालनात बाजी आपल्या पलंगावर तक्क्या गिरद्यांना रेलून बसले होते. पलंगाच्या डावीकडे असलेल्या झरोक्यातून येणाऱ्या वाऱ्यामुळे