रात्र अजून भिजत होती. पावसाच्या सरी एका लयीत आणि धीम्या गतीने बरसत होत्या. तो त्या पुलाचा एका टोकाला, आपल्या कारमध्ये बसून अदमास घेत होता. या पुलावरअपरात्री कोणी फिरकले अशी अपेक्षा नव्हती, तरी तो सावधगिरी बाळगून होता. पुलाखालून गढूळ पाण्याचे थैमान घालत, नदी दुथडी वाहत होती, भयाण आणि भयंकर आवाज करत, भुकेल्या श्वापदासारख्या डरकाळ्या फोडत! पुलाच्या कमरे इतक्या उंचीच्या कठड्याला लागून असलेले विजेचे खांब उजेड पडण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रकाशाने अंधार अधिक गडद भासत होता. रात्र किर्रर्र होती. पुलाच्या रस्त्याचे दुसरे टोक उघड्या डोळ्यांना दिसत नव्हते. त्याने हेड लाईट न लावताच आपली कार सावकाश सुरु केली. पुलाच्या मध्यावर आल्यावर,