जुळले प्रेमाचे नाते - भाग-६

(19)
  • 16k
  • 8k

सकाळी रोजच्या प्रमाणे उठून सगळं आवरून ऑडीमध्ये गेले. तर आज ऑडी बंद होती. मग मी माझा मोर्च्या कॅन्टीनकडे वाजवला. निशांतला कॉल केला तर त्याचा कॉल लागत नव्हता. कॅन्टीनमध्ये जाताना जिन्यात एका मुलाने मला पिंक रोज दिले आणि एक ग्रीटिंग. त्या ग्रीटिंगवर थँक्स असा मॅसेज होता. काही विचारायच्या आत तो मुलगा निघून गेला. असा काय हा...! कोणी दिल हे..? स्वतःशीच पुटपुटत मी कॅन्टीनमध्ये गेले. काही तरी खायचं म्हणून काऊंटर वर गेले तर तिकडच्या एकाने ही मला पिंक रोज आणि ग्रीटिंग दिल. "हे काय.. कोण देत आहे....?? मला कोणी काही सांगेल का...??" मी त्या मुलाला विचारले. सांगत नव्हतं. मग मी ती फुलं