जीवन विकासाची ती सूत्रे आत्मसात कराप्रा. वि. वि. चिपळूणकर यांनी काही वर्षांपूर्वी शिक्षकांशी संवाद साधताना जीवन विकासाची तेरा सूत्रे विषद केली आहेत. आपल्या आयुष्यात आपण या तेरा सूत्रांचे पालन करणे नितांत गरजेचे आहे. असह्य जीवन सुसह्य बनण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. मला आज जेव्हा ही तेरा सूत्रे आठवली त्यावेळी माझ्या कल्पनेतून माझ्या मनात विचारांचे काहूर माजले. खरच या तेरा सूत्रांच्या आधारे जीवन व्यतीत करता येईल का? असा प्रश्न मला पडला. त्या मार्गाने जाणे अवघड आहे मात्र प्रयत्न केल्यास ते सहज शक्य आहे असेच मला जाणवले. केवळ शिक्षकच नव्हे तर समाजातील सर्व घटकांनी या तेरा सूत्राकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे या मताप्रत