३) मी एक अर्धवटराव! आपल्याकडे कसे आहे, मुलाला नोकरी लागली, तो कामाधंद्याला लागला, त्याच्या हाताला एकदाचे काम मिळाले की, तो विवाहासाठी योग्य झाला, वयात आला असा शिक्का बसतो. माझेही तसेच झाले. पदवीधर झालो आणि एका सरकारी कार्यालयात नोकरीला लागलो. झाले. लगेच माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. यात माझी आई आघाडीवर होती. कुणाच्याही आईला तिच्या मुलाच्या लग्नाची घाई सर्वात जास्त असते. लग्नाला नकार देणाऱ्या मुलाचे मन वळवून त्याला 'दोनाचे चार' करायला लावण्यात आईचा सिंहाचा वाटा असतो. माझेही तसेच झाले. इच्छा नसताना आईच्या पुढाकाराने माझ्यासाठी वधुसंशोधन सुरु झाले. नोकरीच्या निमित्ताने मी दुसऱ्या गावी राहात होतो. ते गाव माझ्या राहत्या