प्यार मे.. कधी कधी (भाग-१८)

(17)
  • 12.9k
  • 6.3k

“संध्याकाळी घरी ये..”, हॉटेलमधुन निघताना प्रिती म्हणाली..“प्लिज यार.. घरी नको.. तुझी आई परत खायला घालत बसेल…”“नाही नाही.. आय प्रॉमीस.. तु ये ७ वाजता, मी वाट बघतेय ओके?” ठरल्यावेळी मी प्रितीच्या घरी पोहोचलो.. दार उघडेच होते. कसलातरी मस्त, मंद सुगंध पसरला होता. बाहेर कोणीच नव्हते.. “प्रिती..”, मी हलकेच हाक मारली..“आले आले.. बसं.. दोनच मिनीटं..”, प्रिती आतुन म्हणाली. मी सोफ्यावर बसलो, दोन मिनीटांत प्रिती बाहेर आली. पुर्ण अवतारात होती. केस विस्कटलेले.. हाताला, गालाला, नाकाला पिठ लागलेलं.“ओह प्लिज.. आता तु नको पराठे करुस..”, मी घाईघाईने सोफ्यावरुन उठत म्हणालो..“नाही रे.. पराठे नाही करत आहे.. केक करतेय तुझ्यासाठी..”, प्रिती मी दचकुन इकडे तिकडे बघीतलं. “घरी